या दोन कार्यसम्राटांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा..

0 झुंजार झेप न्युज

या दोन कार्यसम्राटांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा..

पिंपरी प्रतिनिधी: एकाचा वाढदिवस २५ नोव्हेंबर चा तर दुसऱ्याचा २७ नोव्हेंबरला आहे हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्या पैकी ज्यांचा वाढदिवस २५ नोव्हेंबर रोजी आहे.ते नविन भालेकर होय . श्री भालेकर आपला व्यवसाय सांभाळून स्वराज्य प्रतिष्ठान व युवा कामगार सेनेचे काम मोठ्या जोमाने करीत आहेत. त्यांनी युवा कामगार सेना व स्वराज्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यात महापुरुषांच्या जयंत्या असतील किंवा पुण्य तिथी असतील त्या हिरीरीने साजऱ्या करण्याचं काम ते सतत करीत आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम गणपती उत्सव सह सामाजिक उपक्रम राबविण्यात ही ते अग्रभागी असतात. तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून समाजकारणासह राजकारणात सक्रिय सहभाग व दोनदा भोसरी विधानसभचे नेतृत्व करणारे आमदार ज्यांना लोकं आवडीने दादा म्हणतात ते महेश दादा लांडगे होय यांचा दिनांक २७ नोव्हेंबर रोजी आहे त्यांनी ही वेगवेगळ्या स्तरातून सामाजिक, राजकीय, धार्मिक अखंड पणे करीत आहेत. या दोन्ही धुरिणांचे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिष्टचिंतन युवा कामगार सेना व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची छोटीशी झलक या छायाचित्रातून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.