लसिकरण शिबीर आयोजनप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व यंत्रणेला सोबत घ्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कोरोना टास्क समिला सूचना

0 झुंजार झेप न्युज

•प्रत्येक लसिकरण शिबीरात दरदिवशी किमान 200 डोज दिले जावे

•लसिकरण शिबीराची माहिती स्थानिकांना किमान एक आठवडापुर्वी द्यावी

•‘हर घर दस्तक’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक 

•रोज सर्वात जास्त लसिकरण करणाऱ्या टिमला प्रमाणपत्र देणार

यवतमाळ,दि.11 : कोरोना लसिकरिण शिबीराचे आयोजन करतांना संबंधीत गावात किमान एक आठवडा अगोदर सुचना देण्यात यावी जेणेकरून दरम्यानच्या कालावधीत गावचे सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या मार्फत गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करण्यात येवून शिबीराचे दिवशी लसिकरणाची संख्या वाढवता येईल व त्यांचा कोरोनापासून बचाव करता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोरोना टास्क फोर्सच्या तालुका यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी यांनी काल सायंकाळी महसूल सभागृह येथे जिल्हा टास्क फोर्स समितीची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरीया तसेच दूरदृष्य प्रणालीमार्फत सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यातील तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की जिल्ह्यातील कोरोना लसिकरणाची टक्केवारी इतर जिल्यािोच्या तुलनेत कमी असून लसिकरण वाढविण्यासाठी प्रत्येक लसिकरण शिबीरात किमान 200 च्या वर डोज दिल्या गेल्या पाहिजे व त्यासाठी कामाचे नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री महोदयांनी 30 नोव्हेंबर पुर्वी 100 टक्के लसिकरण पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, तरी ‘माझे कुटूंब माजी जबाबदारी’ मोहिमेत ज्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेने घरोघरी फिरून माहिती घेतली त्याचप्रमाणे आता ग्रामस्तरीय टिमने ‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत प्रत्येक घरी जावून कोणाचे लसिकरण अद्याप झालेले नाही, कोणाचा पहिला डोज झाला व दुसरा डोजसाठी पात्र असलेल्या लोकांची माहिती त्यांच्या पत्त्यासह लसिकरणापुर्वी काढावी, जेणेकरून लसिकरण शिबीराचे दिवशी त्यांना बोलावणे शक्य होईल, तरी याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

लसिकरण झाले आहे मात्र अद्याप त्यांची डाटा एन्ट्री ऑनलाईन केलेली नाही अशा तालुक्यांनी टाईमलाईन निश्चित करून लसिकरणाचे आकडे ऑनलाईन प्रणालीवर तातडीने अद्यावत करावे. यासाठी आपले स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तरी बॅकलॉगचे काम पुर्ण करून घ्यावे. कोणत्या तालुक्यात किती लसिकरण झाले याबाबत रोज आढावा घेण्यात येईल व रोज सर्वात जास्त लसिकरण करणाऱ्या टिमला प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच कमी लसिकरण करणाऱ्या टिमची दखल देखील घेतल्या जाईल. तेव्हा टिमवर्क व नियोजनाद्वारे लसिकरणाचे काम या महिनाअखेर पुर्ण करावे, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले.बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.