•तिन लाख मेट्रिक टन ऊस गाळप चे उद्दिष्ट.
विहामांडवा,दि.12(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी):श्रीक्षेत्र चोंडाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२1-22 च्या सहाव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ करून गाळपात सुरुवात करण्यात आली. दि. 12 दुपारी 1 वाजता कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व संचालक मंडळ यांच्या शुभास्ते संपन्न झाला.आज पासूनच पूर्ण क्षमतेने गाळपास सुरवात करण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवून पूर्ण क्षमतेने गाळप करणार आहे तीन लाख मे टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.यावेळी चेअरमन संदिपान भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन राजू भूमरे, रेणुकादेवी शुगर मिल चे दत्तात्रय रेवडकर, रोहिदास रेवडकर,व्हा चेअरमन मानिकराव थोरे,अनिल जाधव,सुभाष चावरे.सुरेश चौधरी,भरत तवार,कल्याण धायकर,संपत गांधले , विष्णु नवथर,संदीपान काकडे,रावसाहेब घावट,महाविर सेठ काला,सोमनाथ परदेशी,लहु पा डुकरे,ज्ञानोबा बोडखे,दत्तात्रय वाकडे,सुभाष गोजरे, शेख महेबुब ,सालार पटेल,नंदु पठाडे, कार्यकारी संचालक नामदेव बावडकर,दादा बारे,बाबुराब पडूळे,,कृष्णा भुमरे,युवा सेना जिल्हा प्रमुख किशोर चौधरी,श्रीमंत टेकाळे,शरद नवथर नामदेव खरात, आक्षय पाटील,व खाते विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी व शेतकरी,मुकादम,तोडनी कामगार उपस्थित होते.
