•विहामांडवा येथे युवा नेते भाऊसाहेब काळे यांच्या भाजपा मधे प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा
विहामांडवा (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): राज्यातील जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आलेले अमर अकबर अँथनी सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठल आहे त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगला धडा शिकवा असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विहामांडवा येथे युवानेते भाऊसाहेब काळे व असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्यात बोलतांना म्हणाले. या सरकारने कोरोना काळात शेतकरी, उद्योजक,व्यापारी, लहान व्यावसायिक यांच्यासाठी कसलेही ठोस पावले उचलली नाही त्यामुळे या दळभद्री सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा सरचिटणीस पदावर असलेले भाऊसाहेब काळे यांनी रोजी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी,
किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्याण गायकवाड, संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे, भाजपा सरचिटणीस लक्ष्मण औटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगराध्यक्ष सुरज लोळगे, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील शिंदे,गोरख चव्हाण,भाऊसाहेब बोरुडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाऊसाहेब काळे यांच्या सोबत समर्थकांनी व
यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
प्रल्हाद एखंडे,दिपक येवले,अमोल वाकडे,आकाश वाकडे, ज्ञानेश्वर पवार,दत्ता बोडखे, पांडुरंग बोडखे नामदेव बोडखे,प्रमोद काळे,संपत करताडे,रवींद्र बोडखे चंद्रकांत खैरे शिवाजी,गरड सुभाष बोडके हरिभाऊ बोडखे उद्धव ब्रह्मराक्षस विज्ञान बोडखे सुरेश बोडखे शरद पुरी, बंडू बोडखे,पप्पू शिंदे, रवी येवले,नंदकिशोर बोडखे,महेश बोडखे, गोकुळ मोरे,योगेश ब्रम्हराक्षस, ईश्वर तळपे,आदी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी विहामांडवा सर्कल मधील गेंदलाल सकलेचा, दत्ता वाकडे, विलास संत, मोहन भाकरे ,शंकर धायकर, रामभाऊ हकम, उमेश निकम, रामभाऊ मोटकर,बाळासाहेब शिंदे, दिगंबर नाटकर, देवीदास करताडे, सुलोचना साळुंखे,दासाराव काळे, नसरुल्लाह पठाण, हे ही उपस्थित होते.
