लहाण मुलाने गेटवर दगड मारण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात वृध्द आजी गंभीर जखमी
विहामांडवा (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): गल्लीमधे मुले खेळत असतांना शेजारच्या गेटला दगड लागल्याने उद्भलेल्या भांडणात वृध्द आजी ला एका महिलेने कंबरात लाथा घातल्याने कंबरातील हाड तुडले असुन गंभीर अवस्थेत आजींना औरंगाबाद येथे उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल केले असुन संबधित महिले विरुध्द कलम 325,323,504,506 नुसार पाचोड पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल झालाअसुन सपोनि गणेश सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली विहामांडवा पोलिस चौकीचे स.पो.उपनि.सुशांत सुतळे,स.फौ.मोहिते,पो.ना.आप्पासाहेब माळी हे पुढिल तपास करत आहे पोलिस सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की शांताबाई विट्ठलराव शिंदे वय80 वर्ष ह्या गावातच राहत असलेल्या शिंदुबाई दामोधर वैद्द या आपल्या मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या यावेळी गल्लीमधे खेळत असलेल्या नातवासाठी काहीतरी खायला आणावे याहेतुने जवळच असलेल्या किराणा दुकाणात जात असतांना खेळत असलेल्या नातवाकडुन शेजारीच असलेल्या घराच्या गेटला दगड लागल्याने घरातील महिला शिविगाळ करत भांडु लागली तितक्यात संबधित मुलाची आजी शिंदुबाई ह्या समजावुन सांगण्यास आल्या असता शेजारीच राहत असलेल्या महिले ने शिविगाळ करत शांताबाई शिंदे या वयोवृध्द आजी च्या कंबरेत लाथा घातल्या व मुलगी शिंदुबाई यांना चापट बुक्क्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली गल्लीत चालु असलेले भांडण सोडण्यासाठी सारीका वैद्य ,सोमनाथ वैद्य, राहुल साखरे सोडवा सोडव करत शांताबाई यांना स्थानिक दवाखान्यात दाखल केल असता कंबरातील हाड तुडल्याने पुढिल उपचारार्थ त्यांना औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे प्रफुल्ल दामोदर वैद्य यांच्या तक्रारीवरुण संबधित शेजारील महिलेवर दि.14/12/21रोजी पाचोड पोलिस स्टेशन मधे भादवी कलम 325,323,504,506, नुसार गुन्हा दाखल झालाअसुन सपोनि गणेश सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली विहामांडवा पोलिस चौकीचे स.पो.उपनि.सुशांत सतळे,पो.ना.आप्पासाहेब माळी हे करत आहे
