पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘वसंत’ पुन्हा बहरणार

0 झुंजार झेप न्युज

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी बँकेने ना-हरकत द्यावी सहकार मंत्र्यांच्या सूचना

यवतमाळ,दि.15: उमरखेड, महागाव, पुसद, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘वसंत सहकारी साखर कारखाना’ अतिशय महत्वाचा असून येथील 15 ते 20 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या साखर कारखान्यामुळे सुगीचे दिवस यावे, यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पुढाकारातून वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. कारखाना सुरू करणे व अवसायनाची प्रक्रीया मागे घेणे या विषयावर निमंत्रक वसंत साखर कारखाना बचाव संघर्ष समिती उमरखेड यांनी पालकमंत्री यांना विनंती केली असता पालकमंत्री भुमरे यांचे निवेदनावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात सभा बोलावली होती.

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देणेसंबंधाने बँकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळणेकरीता बँकेने संचालक मंळडाची तात्काळ सभा आयोजीत करावी व कारखान्यास ना-हरकत देणेसंबधाने तसा निर्णय घ्यावा, जेणेकरून कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, अशा सुचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभेत दिल्या.

सहकार मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या सभेला पालकमंत्री संदीपान भुमरे, साखर आयुक्त पुणे, निमंत्रक वसंत साखर कारखाना बचाव संघर्ष समिती उमरखेड, अवसायक वसंत कारखाना तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर आदि मान्यवर प्रत्यक्ष व व्हिडीओ कॉन्सफरन्सींग द्वारे सभेला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.