शिवजयंतीसाठी नियमावलीत शिथीलता मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार : अजित पवार

0 झुंजार झेप न्युज

शिवजयंतीसाठी नियमावलीत शिथीलता मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार : अजित पवार

पुणे: पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार   यांनी आज पुण्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील आढावा बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जागतिक पातळीवर, देश पातळीवर आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी 7 दिवस शिल्लक आहे. यावर्षी शिवजंयती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नियमावली जाहीर झाल्यानंतर ती विविध खात्यांना दिली जाईल, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि मला शिवनेरी किल्ल्यावरील जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

शिवनेरीवरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं त्यांना शिवनेरीवरील कार्यक्रमात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जन्मसोहळ्यातील कार्यक्रमात आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी शिवेनरीवर उपस्थित राहणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.