सरकारी अभियोक्त्यांकडून मार्गदर्शन
वर्धा,दि.11: महसूल विभागाकडे वेगवेगळया प्रकारची अर्घन्यायीक फौजदारी प्रकरणे दाखल होत असतात. या प्रकरणांची मांडणी करतांना ती योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. त्यासाठी संबधितांना याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत सोळके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रसाद सोईतकर, उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, शिल्पा सोनुले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलिस निरिक्षक व सहाय्यक पोलिस निरिक्षक उपस्थित होते.
महसूल विभागातील अर्धन्यायीक फौजदारी प्रकरणे हाताळतांना व पोलिस विभागांकडून प्रकरणाची मांडणी करतांना ती कायदेशीर दृष्टीने भक्कम व सबळ पुराव्यानिशी असणे आवश्यक आहे. मांडणी व्यवस्थित न झाल्यास आरोपी गुन्ह्यातून सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे फौजदारी प्रकरणे तयार करतांना पोलिस विभागाने अधिक दक्षत घेणे आवश्यक असते. यासाठी पोलिस व महसूल विभागाच्या अधिका-यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रसाद सोईतकर यांनी उपस्थित सर्व अधिका-यांना महसूल विभागातील अर्धन्यायीक फौजदारी प्रकरण तयार करतांना कोणत्या गोष्टी प्राधान्याने तपासल्या पाहिजे. प्रकरण तयार करतेवेळी घ्यावी लागणारी दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
