सेवा सारथी आयोजित चित्रकला स्पर्धेला बालचामुंचा उस्फूर्त प्रतिसाद!
पुर्णानगर चिंचवड,दि.22 : नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या सेवा सारथी संस्थेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील रविवारी दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी शनिमांदिर पूर्णानगर, चिंचवड या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेला मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.सेवा सारथी आयोजित चित्रकला स्पर्धेत दोन गट पाडले होते.पहिला गट २ री ते ६ वी आणि दुसरा गट ७ वी ते १२ वी असा होता. लहानग्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या कल्पनाशक्तीने साकारलेली चित्रे उद्याच्या भवितव्याची रंगीबेरंगी आकृती रचत होते. स्पर्धेचे आयोजन ओंकार मांडगे यांनी केले.
या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हा स्पर्धेच्याच दिवशी संध्यकाळी ठीक ६:०० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण , पूर्णानगर (शानिमंदिर) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.लहान गटात राशी नागारेड्डी(प्रथम क्रमांक),रिशी नागारेड्डी (द्वितीय क्रमांक),मृण्मय तामखे (तृतीय क्रमांक),स्वरा कुलकर्णी (उत्तेजनार्थ)तन्मय पाल. (उत्तेजनार्थ), तर मोठ्या गटात तमन्ना पाटील (प्रथम क्रमांक),अथर्व शिर्के (द्वितीय क्रमांक),प्रेरणा शिर्के (तृतीय क्रमांक),गायत्री गोडचे(उत्तेजनार्थ),प्राची चव्हाण (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिके पटकावली. स्पर्धे मध्ये एकूण 528 जणांनी सहभाग नोंदवला तसेच सर्व स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून "धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे संस्थापक" मिलिंद एकबोटे, तसेच आदरणीय पाहुणे उद्योजक गंगाधर मांडगे , एकनाथ पवार ,शिव व्याख्याते साचींजी ढोबळे नगरसेवक योगिताताई नागरगोजे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढमढेरे , अनिकेत शेलार , कविता हिंगे यांनी आपली उपस्थिती देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.सेवा सारथीला आपले कुटुंब मानणारे आणि सदैव संस्थेसाठी कार्य करणारे नीळकंठ कुलकर्णी,श्रीधर कुंभार, शुभम खनका,योगेश पाठक,आर्यन महाजन, साहिल घुले,जयेश मोरे,सुदर्शन पाटील,अजय मोरे,स्मृती पोठगन,अर्णव दीक्षित,जयंत हुसे,प्रथमेश फेगडे ,नितीन कोरडे,पंकज दलाल,ईशान मोटे, तरुण हिंगे तसेच धनश्री मांडगे,अर्चना सोनवणे,वैष्णवी ,पूजा काळे,मेघा चौघुले, रोहन शिंदे,शुभम घारगे,स्मृत्ती पोटगन, अर्णव दिक्षित,जयंत हुसे, प्रथमेश फेगडे, मनिषा यंबळवार यांनी देखील स्वयंसेवक म्हणून मोलाचे सहकार्य केले.
