ई चलानची प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना निश्चितच मदत होईल! महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण डोंबिवली,दि.22: ई चलानची प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना निश्चितच मदत होईल असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व पोलिस उपआयुक्त वाहतुक विभाग बाळासाहेब पाटील यांचे हस्ते ऑनलाईन पध्दतीने ई-चलान प्रणालीचा शुभारंभ करतेवेळी त्यांनी हे उद्गार काढले. मुंबई महानगरपालिकेनंतर एमएमआर रिजनमध्ये कडोमपाने ही सुविधा सुरु केली आहे. वाहतूकीचे नियम न मोडता नागरिकांनी आता सजग होणे आवश्यक आहे. स्मार्टसिटीच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न या निमित्याने होत असून त्यास नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे., असेही पुढे ते म्हणाले.
एसकेडिसीएल यांचे मार्फत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरमधून इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर प्रणालीद्वारे ट्रॅफिक सिग्नलवर स्टॉप लाईनचे तसेच लाल दिव्याचे उल्लंघन केल्यास कॅमे-यामध्ये त्या वाहनाच्या क्रमांकाची नोंद केली जाते. सदर प्रणालीचे महाराष्ट्र पोलिस विभागाच्या ई-चलन प्रणाली बरोबर एकीकरण करण्यात आलेले आहे आणि सदर ई-चलन पाठविण्यास आजपासून प्रारंभ करण्यात आलेला आहे.
या समयी वाहतूक पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील, महापालिका शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, एसकेडिसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, वाहतूक विभागाचे सहा. पोलिस आयुक्त धर्माधिकारी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक,वाहतूक -तरडे तसेच महापालिकेचा इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
