क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा
नागपूर (तालुका प्रतिनिधी संघरत्न प्रेमचंद ऊके) : तालुक्यातील तारणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त विविध गावांमध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यामध्ये रुयाळ,विरखंडी,चिकणा ह्या वरील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु.भाविका खंडाळकर सप्तखंजेरी वादक व बाल समाज प्रबोधनकार कार्यक्रम यशस्वी रुयाळ ह्या गावात झाले आहे. प्रामुख्याने उपस्थित पाहुणे मा.श्री.ॲड.भुपेंद्र सोने,मा.श्री. बुध्दमजी मेश्राम,मा.सौ.नेहाताई ढेंगे सरपंच, मा.श्री.फुलचंदबोरकर,मा.श्री.खांबाळकर,मा.श्री.देविदास गवळी पंचायत समिती सदस्य कुही,देवानंद उके,देवानंद रामटेक,सजन पाटील,विशेष म्हणजे विरखंडी, गावातीलच पोलिस पाटील,अभिमन खराबे प्रामुख्याने उपस्थित होते.भिमबुध्द गितांचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.त्याच प्रमाने चिकणा गावातील पुरुषोत्तम कावळे सर,धम्मजोती मेश्राम,केशव चव्हाण, यांनी सप्तखंजेरी वादक मा.श्री.संदिप पाल महाराज यांच्या जाहीर समाज प्रबोधनपर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक स्त्रिया मुले मुली यांनी हिरीरीने सहभाग घेतला व येणाऱ्या पीढीला महापुरुषांच्या जीवनातील आधारीत प्रेरणादायी विचार प्रेरीत केले.अशाप्रकारे गुरू शिष्याची जयंती तारणा पंचायत समिती मध्ये हर्ष उल्हासात यशस्वी केली.

