फूले शाहू आंबेडकर कलामहासंघाची महत्त्वाची मीटिंग यशस्वी

0 झुंजार झेप न्युज

फूले शाहू आंबेडकर कलामहासंघाची महत्त्वाची मीटिंग यशस्वी

पिंपरी चिंचवड,दि.08: बर्याच दिवसांपासून कलामहासंघात सुरू असलेली चर्चा अखेर लोकशाही पद्धतीने शांत झाली.आज फूले शाहू आंबेडकर कला महासंघाची भीमसृष्टी येथे महत्त्वाची मीटिंग झाली त्यामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान झाले.अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली त्यात प्रामुख्याने लक्ष्मण माने व भारत बाबू लोणारे हे दोघं अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उभे होते मीटिंग साठी एकूण 17 सदस्य उपस्थित होते उपस्थितांपैकी 7 मत भारतबाबू व 10 मते बापू माने यांना पडली.चार सदस्यांनी फोन द्वारे मत पाठवले पैकी तीन मत बापू माने व एक मत भारत भाऊ यांना पडलं या निवडणुकीत भारत बाबुला एकूण आठ व बापू माने यांना 13 मते पडले त्यामध्ये बापू माने यांचा बहुमताने विजय झाला.सर्व उपस्थित कलावंतांनी नंतर बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून व पेढे वाटून आनंद साजरा केला. या निवडणुकीत अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी निवडणूक आयोगाचे कार्य उत्तमरीत्या पार पाडलेकलामहासंघाचे अध्यक्ष बापू माने यांनी त्याच ठिकाणी दोन पदांची नियुक्ती केली.कार्याध्यक्ष. अनिरुद्ध सूर्यवंशी खजिनदार.किशोर रणवीर,अध्यक्ष बापू माने यांनी सर्वांचे आभार मानून मिटिंगचा समारोप केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.