२४ तास पाणीपुरवठ्यासाठी केवळ घोषणा केलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये - आमदार महेशदादा लांडगे यांचा टोला

0 झुंजार झेप न्युज

२४ तास पाणीपुरवठ्यासाठी केवळ घोषणा केलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये - आमदार महेशदादा लांडगे यांचा टोला 

पिंपरी चिंचवड,दि.30: तत्कालीन आयुक्तपदी दिलीप बंड असताना व स्वतः अजित गव्हाणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविले त्यासाठी मीटर प्रमाणे पाणी देणे सुरू केले. मात्र खऱ्या अर्थाने भाजपनेच शहरवासीयांना २४ तास पाणी मिळावे या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन, कनेक्शन बदलणे, आंद्रा मधून शंभर एमएलडी पाणी, भामा आसखेड मधून २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी वेगाने सुरू असलेली कामे हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठ्यासाठी केवळ घोषणा केलेल्या नेत्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, असा टोला भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी हाणला आहे.

२४ तास पाण्याचे नियोजन फसले असल्याची टीका भोसरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. त्या पाठोपाठ खासदार निलेश लंके यांनी भोसरी मतदारसंघात गेल्या दहा वर्षात कोट्यावधीचा निधी आला, पण नागरिकांना पाण्यासाठी तहानलेले राहावे लागत असल्याची टीका केली होती. त्याला आमदार महेशदादा लांडगे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी चिंचवड महापालिकेत २४ तास पाणीपुरवठ्याची घोषणा करण्यात आली .त्यावेळी अजित गव्हाणे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याच कार्यकाळात थेट बंद नळाने पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने ही योजना फसली. महापालिकेला वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्न केले. पिंपरी महापालिकेला नियंत्रित पाणी मिळते.पवना धरणातून ४७० एमएलडी पाणी मंजूर कोटा आहे. आंध्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी मिळवण्यात आम्हास यश आले.

त्यामुळे भोसरी चिखली, च-होली, मोशी भागाला त्याचा फायदा होत आहे. भामा आसखेड मधून २०० एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे त्याचे काम सुरू आहे. पंपिंग, जॅकवेल, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे. येत्या दोन वर्षात तेही वाढीव पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे शहराला एकूण ८०० एमएलडी एवढे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्य पर्यायांचाही विचार केला जात आहे. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. केवळ गप्पा मारत नाही. भाजपाच्या सत्ता काळात अमृत योजनेअंतर्गत शहरातील पाईपलाईन तसेच कनेक्शन बदलले अनेक कामे करण्यात आली याची आठवणही आमदार लांडगे यांनी करून दिली आहे. कामे न करणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.