विरोधकांनो,... माझ्या माता-भगिनी अन्‌ कार्यकर्त्यांसाठी मी ‘‘धारकरी’’

0 झुंजार झेप न्युज

- आमदार महेश लांडगे यांचा विरोधकांना गर्भीत इशारा

- माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल, तर २० तारखेनंतर बघा! 

पिंपरी चिंचवड,दि.08: विरोधकांनी आरोप करताना अक्षरशः पातळी सोडली आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाटते की मी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यावे. पण, मी पातळी सोडून बोलणार नाही. मी आरोपांना उत्तर देणार नाही माझ्याकडे पुरावे आहेत मी काम मांडत राहणार विरोधकांना त्यांचे उत्तर मिळेल. पण, माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देणार असेल, तर माझी विरोधकांना विनंती आहे की, माझा मूळ स्वभाव जागा करु नका. १३ दिवसांत निवडणूक होईल. माझ्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला, तर २० तारखेनंतर माझा स्वभाव बदलणार. माझ्या माता-भगिनी आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी ‘‘धारकरी’’ आहे, हे लक्षात ठेवा, असा गर्भीत इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. 

महायुतीच्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे , आमदार उमा खापरे, अमित गोरखे, कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेते दत्ताआबा गायकवाड, माजी उपमहापौर हिरानानी घुले, भाजपा निवडणूक प्रमुख विकास डोळस, समन्वयक विजय फुगे, माजी नगरसेवक निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, केशव घोळवे, शिवसेनेचे इरफान सय्यद, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

आमदार महेश लांडगे म्हणाले की, सुसंस्कृत नेत्यांनी माझ्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. मला बरेच जणांनी सांगितले की याबाबत बोलले पाहिजे. पण मी सुसंस्कृत नेत्यांबद्दल बोलायचे सोडूनच दिले आहे.सुसंस्कृत नेत्यांना आपण जास्त बोलणे उचित ठरणार नाही असे मला वाटते. विरोधकांना असे वाटते की आरोप केले की नागरिक निवडून देतील. पण केवळ आरोप करून आपण सिद्ध होत नाही कर्तुत्वातून आपल्याला सिद्ध व्हावे लागते. सुसंस्कृत उच्चशिक्षित लोकांचा खरेच अभ्यास असेल तर त्यांनी या वाक्याचा नक्की अभ्यास करावा. 

महेश लांडगे पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून दिघी परिसरात काम करत आहे. असे सांगून महेश लांडगे म्हणाले 2014 मध्ये मी अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलो. मी तळागाळातला नेता आहे. नगरसेवक म्हणून काम करताना माझ्याकडे काम घेऊन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी जात, धर्म, मुख्य म्हणजे त्यांचा पक्ष पाहून मदत केली नाही. माझ्याकडे समस्या घेऊन आलेल्या कोणत्याही घटकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी मदत केली, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. 

दिघी परिसरात 57 कोटी 38 लाख शास्तीकर माफी...

या सभेत शास्तीकर माफी बद्दल महेश लांडगे यांनी हिशोबच मांडला. दिघी परिसरात 5 हजार 981 मिळकतींचा शास्तीकर माफ झाल्याचे सांगितले. कर माफी झालेली रक्कम तब्बल एक 57 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे . याचा अर्थ जवळपास 5 हजार कुटुंबांना याचा लाभ झाला. हे एका भागाचे झाले. संपूर्ण शहरात किती कर माफी झाली आहे. याचा सुसंस्कृत नेत्यांनी अभ्यास करावा, असा उपरोधिक टोलाही आमदार लांडगे यांनी लगावला आहे. 

प्रतिक्रिया : 

दिघीकडे जाताना विरोधक ज्या रस्त्याने माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी येतात. तो रस्ता देखील भाजपा शासन काळातच झालेला आहे. सुसज्ज रस्त्यावरून जाता आणि दहा वर्ष महेश लांडगेने काय केलं विचारता. भारतातील पहिले संतपीठ माझ्या भोसरीत झाले, याचा अभिमान वाटतो. पण, स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारे नेते संतपीठाचे संचालन करणारे जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांचे कॅलिबर काय आहे? असा प्रश्न विचारतात. राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे. 

- महेश लांडगे, भोसरी विधानसभा, उमेदवार, महायुती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.