"बांग्लादेश येथुन भारतात घुसखोरी केलेल्या तीन बांग्लादेशी महिलांना मानपाडा येथुन अटक"

0 झुंजार झेप न्युज

"बांग्लादेश येथुन भारतात घुसखोरी केलेल्या तीन बांग्लादेशी महिलांना मानपाडा येथुन अटक"

ठाणे,दि.15: मानपाडा पोलीस ठाण्याचे ह‌द्दीत अनिल पाटील चाळ नंबर २, रूम नं.८, कृष्णा मंदिराच्या मागे, कोळेगाव, डोंबिवली पूर्व याठिकाणी बांगलादेश येथुन भारतात घुसखोरी केलेल्या तीन महिला कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसताना वरील ठिकाणी वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगरचे पोहवा/सुरेश जाधव यांना मिळाली होती.

सदर बातमीची खात्री व पाठपुरावा करून लागलीच गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगरचे वपोनिरी/अशोक कोळी यांनी एक पथक स्थापन करून दिनांक १४.०१.२०२५ रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळेगाव, अनिल पाटील चाळ नंबर २, रूम नं.८ या ठिकाणी सापळा रचुन तीन महिला नामे १) रोजिना बेगम सुकूर अली, वय २९ वर्षे, रा. नवपारा अभयनगर, उपजिल्हा, जेसोर जिल्हा, खुलना विभाग २) तंजिला खातून रज्जाक शेख, वय २२ वर्षे, रा. नवपारा अभयनगर, उपजिल्हा, जेसोर जिल्हा, खुलना विभाग ३) शेफाली बेगम मुनीरूल शेख, वय २३ वर्षे, रा. नवपारा, अभयनगर उपजिल्हा, जेसोर जिल्हा, खुलना विभाग यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्चा संबधीत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कोणतेही वैध कागदपत्र असल्याचे सांगितले तसेच त्या मुळ बांग्लादेश येथील असल्याचे व त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी लागणारे प्रवासी वैध कागदपत्रे नसल्याचे व अवैध मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून लपत छपत भारतीय सरहद्यीमध्ये प्रवेश करून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना रहात असल्याचे सांगितले.

त्यावरून सदर तीनही बांग्लादेशी महिलांविरुध्द मानपाडा पोलीस ठाणे येथे पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३,४ सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १३, १४ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाई करणेकामी मानपाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंग जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- १) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि/श्री. अशोक कोळी, पोउनि/प्रविण खोबरे, पोहवा / ३१७७ प्रकाश पाटील, पोहवा /१०७५ शेखर भावेकर, मपोना / ७८७० कुसूम शिंदे, मपोशि/४३०१ मनोरमा सावळे, विक्रम पाटील, प्रसाद तोंडलीकर सर्व नेमणूक गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.