राजकीय दबावामुळे नगररचना अधिकाऱ्यांनी जास्त जागा भूखंड मार्किंग केली: सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.19: त्रिवेणी नगर तळवडे गट क्रमांक १६४/ब ह्या जागेतून सपाईन रोड तसेच बी आर टी मार्ग रोड साठी रस्ता रुंदीकरण करण्यात येत असून त्या ठिकाणी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगररचना विभाग ह्यांनी माझ्या जागेवर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मार्किंग नकाशा क्षेत्र पेक्षा जास्त प्रमाणात करण्यात आली.
असून त्या संदर्भात उपसंचालक नगररचना विभागाचे अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन तळवडे गट क्रमांक १६४/ब ह्या जागेतील रस्ता रुंदीकरण तात्पुरते स्वरुपात थांबवण्यात यावे तसेच पुन्हा नकाशा तपासणी करून नव्याने रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मार्किंग करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे राजकीय दबावामुळे नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी ह्यांनी प्रमाणापेक्षा जास्त जागा भूखंड मार्किंग केली असून त्या संदर्भात मी आपणास नम्र विनंती करत आहे की सदर प्रकरणी ताबडतोब दखल घ्यावी ही नम्र विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर

