दिशा दिवाळी फराळात रंगली राजकारणाच्या पलीकडची गप्पांची मैफल

0 झुंजार झेप न्युज

मतभेद विसरून उत्सवी वातावरणात हरवले चेहरे 

मान्यवरांनी अनुभवली खरी आत्मीयतेची दिवाळी

पिंपरी,पुणे,दि.20 : दिवाळीचा उत्साह, फराळाचा सुगंध, आनंदाचे सूर...अशा आनंदमय आणि उत्सवी वातावरणात दिशा सोशल फाऊंडेशनच्या ‘दिवाळी फराळ’ने रविवारी (१९ ऑक्टोबर) आनंदाची पर्वणीच दिली. राजकीय आखाड्यातील प्रतिस्पर्धी नेते, प्रशासकीय अधिकारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर एकाच छताखाली जमले. हास्यकल्लोळ, गतस्मृतींना उजाळा आणि धमाल किश्श्यांमुळे जवळपास चार तास गप्पांची ही मैफल रंगली.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरीतील ‘ श्री कृष्ण पॅलेस’ मधील ‘सुदामा हॉल’ मध्ये या दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, राहुल जाधव, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, तुषार कामठे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, सदाशिव खाडे, अजित गव्हाणे, सचिन साठे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, निलेश शिंदे, सलीम शिकलगार.

माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, पिंपरी पालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे, स्वामी रामानंद विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर, प्राचार्य नितीन घोरपडे, लेखक सौरभ कर्डे, श्रीकांत चौगुले. 

अर्जून पुरस्कार विजेते शांताराम जाधव, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, हिंद केसरी अमोल बुचडे, भारत केसरी विजय गावडे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. संचालक गिरीश देसाई, माजी नगरसेवक सुरेश भोईर, धनंजय काळभोर, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, बाळासाहेब मोरे, संतोष कांबळे, अमित गावडे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, अमित बाबर, पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती माणिकराव अहिरराव.

नाट्यनिर्माते राहुल भंडारे, कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप, अभिनेते नितीन धुंदुके, महेश मोहगावकर, ‘कलोपासक’चे प्रदीप पाटसकर. ‘चंद्ररंग’चे संचालक विजय जगताप, ‘यशदा’ ग्रूपचे संचालक वसंत काटे, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, इंद्रायणी बँकेचे संस्थापक ॲड. एस. बी. चांडक, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

दिशा सन्मान सत्कार सोहळा

या सोहळ्याचा शिखरबिंदू ठरला, तो प्रसिध्द निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार. 

खासदार श्रीरंग बारणे व माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते दिशा सन्मान देऊन गाडगीळ यांना गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘नाळ २’ या मराठी चित्रपटातील लक्षवेधी भूमिकेसाठी पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला बालकलाकार भार्गव रत्नकांत जगताप याचा सत्कार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी पालिकेच्या आयटीआयचे सेवानिवृत्त अधिकारी मनोज ढेरंगे यांचा सत्कार माजी खासदार अमर साबळे व आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पवारांचा सत्कार करण्यात आला. वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार माजी आमदार विलास लांडे व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.