“नागरिकांचा आरोप : आयुक्त आणि भाजप शहराध्यक्ष यांची मिलीभगत, आंदोलन रद्द होण्यामागे राजकीय सौदा?”
पिंपरी चिंचवड: निगडी ते पिंपरी मेट्रोच्या कामामुळे मुंबई–पुणे महामार्गावरील रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. दररोज वाहनचालक आणि नागरिक यांचा जीव अक्षरशः धोक्यात आहे. मात्र या गंभीर प्रश्नावर तोडगा निघण्याऐवजी, प्रशासन आणि सत्ताधारी एकमेकांची पाठ थोपटत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
भारतीय जनता पक्षाकडून ३१ ऑक्टोबर रोजी आयुक्त निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. पण, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आयुक्त हर्डीकर यांच्या भेटीनंतर अचानक हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
स्थानिकांच्या मते, खड्डे बुजवण्याचे आश्वासन देऊन आंदोलन रद्द करण्यामागे राजकीय मिलीभगत आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न दिसून येतो.
दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येईल. पण नागरिकांचा विश्वास मात्र संपलेला दिसतोय.
