मुंबई | मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येतंय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे.
संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक असल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आज त्यांना डिस्चार्ज मिळताच पुन्हा एकदा शिवसेनेची कणखर बाजू मांडताण्यासाठी ते सज्ज झाल्याचं दिसतंय.
भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत दिलेला शब्द दिलेला पाळला नाही. मात्र तरिही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकच बसणार, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील, अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं राऊत ते म्हणालेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या शक्यतेचं खंडण केलं आहे.

