'सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्येतील पाच एकर जागा काँग्रेसला दान करावी' - जलील

0 झुंजार झेप न्युज


औरंगाबाद: अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर असददुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष कमालीचा नाराज झाला आहे. अयोध्येत मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात येणारी पाच एकर जागा आम्ही काँग्रेसला दान करू. जेणेकरून बाबरी मशीद त्यांच्या काळात उद्ध्वस्त झाली त्याची आठवण म्हणून याठिकाणी काँग्रेस भवन स्थापन करता येईल, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी औरंगाबाद येथील पत्रकारपरिषदेत होते.
     यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविषयी नाराजी व्यक्त केली.
   त्यांनी म्हटले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. मात्र, ही लढाई न्यायासाठी होती. मशीद बांधण्यासाठी देण्यात आलेल्या पाच एकर जागेची आम्हाला गरज नाही. इतकं सगळं जे चाललं होतं, ते कशासाठी आणि कुणासाठी सुरु होतं, हे अखेर स्पष्ट झाले. या निर्णयामुळे भाजप आणि काँग्रेसवाले सर्वात जास्त खूश झाले असतील. सुन्नी वक्फ बोर्डाने ही पाच एकर जागा स्वीकारू नये. ही जागा आम्ही काँग्रेसला दान करू. याठिकाणी त्यांना काँग्रेस भवन स्थापन करता येईल. असे इम्तियाज जलील यांनी म्हटले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.