अयोध्या प्रकरणावर सर्वोच्चन्यायालयाने दिलेल्या निर्णयावर धार्मिक भावना दुखावणारी प्रतिक्रिया दिल्याने ऑल इंडिया मजलिस ए इत्तिहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. भोपाळच्या जहांगीरबाद पोलिस ठाण्यात ओवैसींवर या संदर्भात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
ओवैसी म्हणाले होते की, ज्यांनी 6 डिसेंबर 2019 रोजी बाबरी मशीद पाडली त्यांनाच न्यायालयाने ट्रस्ट स्थापन करायला सांगून मंदिराच्या उभारणीचे आदेश दिले आहेत. मात्र, मुस्लिम आपल्या कायदेशीर अधिकारांसाठी लढा देतील. आमचा संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे
आम्हाला पाच एकर जमिनीचे दान नको. हैदराबादच्या रस्त्यांवर भीक मागितली तरी आमच्याकडे उत्तर प्रदेशात मशीद बांधण्यासाठी पैसे जमा होतील. पाच एकर जमीन देण्याची बाब म्हणजे मुस्लिमांच्या श्रद्धेचा अपमान आहे. दरम्यान, ही प्रतिक्रिया धार्मिक भावना दुखावणारी असल्याचे भोपाळचे वकील अॅड. पवनकुमार यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे. देशद्रोह आणि धार्मिक भावना दुखावल्याचे एफआयआरमधील तक्रारीत म्हटले आहे. अयोध्या प्रकरणावरील निकालानंतर ओवैसींनी केलेल्या विधानाचा उल्लेखही तक्रारीत आहे.

