पिंपरी : शहरामध्ये विविध ठिकाणी चार अपघात झाले. यामध्ये दोघांजणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड येथे डंपरने ज्येष्ठ नागरिकांला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ७) सकाळी दहा वाजता बिजलीनगर येथील श्रीपाद गुड इंग्रजी माध्यमिक शाळेसमोर घडली.
बजरंग जोरकर (वय ६५) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

