धुळ्यामध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

0 झुंजार झेप न्युज

धुळे - धुळ्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे. उस्मानाबादला जात असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून मजूर घेऊन जाणारी पिकअप व्हॅन खाली कोसळली.
या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मजूर उस्मानाबादकडे जाताना हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Maharashtra: 7 people killed and more than 20 injured after a pick up vehicle fell off a bridge in a river near Vinchur in Dhule, early morning today.
View image on TwitterView image on Twitter
24 people are talking about this

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.