महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी आणि नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी पदी पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्च, एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन, निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा राबवून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने, तसेच पक्षाची धेय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शशिकांत शिंदे सहकार्य करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळालं आहे.
शशिकांत शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी देखील त्यांचं नाव चर्चेत होत. एवढंच नाहीतर अजित पवार हे देखील त्यांच्यासाठीच आग्रही असल्याच देखील बोललं जातं होत. त्यामुळे आत्ताची ही निवड शशिकांत शिंदे कसे योग्य ठरवतात हे पाहण्यासारखं असणार आहे. यावेळी कोषाध्यक्ष , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, समन्वयक बसवराज पाटील नागराळकर आदी नेते उपस्थित होते

