महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. गोव्यात सध्या भाजपाचं सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत.
आमच्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण संपलं असून सध्या गोव्याच्या राजकारणात व्यस्त आहोत असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: Goa Forward Party president & ex-Dy CM of Goa, Vijai Sardesai along with 3 MLAs, is forming alliance with Shiv Sena. A new political front is taking shape in Goa, just like it happened in Maharashtra. Jaldi hi Goa mein bhi aapko ek chamatkar dikhai dega.
961 people are talking about this
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्याच्या भुमिकेतून बाहेर पडणं गरजेचं असून, उत्तम विरोधक म्हणून काम करतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावला. याआधीच्या विरोधी नेत्यांनी केलेल्या कामाचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा असंही यावेळी त्यांनी सांगितलं. "मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली चर्चा गोपनीय असते. पहिल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावंर चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांसंबंधी चर्चा सुरु असून उद्धव ठाकरे दोन दिवसांत त्याचा पूर्ण अभ्यास करतील आणि निर्णय घोषित करतील," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.


