शनिवारी राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग पकडला आहे. त्यात सर्व माध्यमकर्मी जिथे राजकीय नेते असतील तिथे धावपळ करीत आहेत. या कार्यात बातमी आणि दृश्य मिळवण्यासाठी माध्यकर्मी जिवाचे रान करत आहेत. या मुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काळजी व्यक्त केली आहे.
माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. pic.twitter.com/HrXTkaw39L
सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कॅमेरामनचे बाईकवरील दोन फोटो टाकून काळजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी कॅप्शनमध्ये म्हणाल्या आहेत की 'माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या

