सिंहगडाचा घाटरस्ता आजपासून एक महिना पर्यटकांसाठी बंद

0 झुंजार झेप न्युज

सिंहगड घाट रस्त्यावरील दरड पडत असलेल्या भागात संरक्षण जाळ्या बसविण्याचे काम आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आज 2 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
गडावर जाण्यास इच्छुक पर्यटकांनी पायवाटेचा वापर करावा असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सिंहगड घाट रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात. पर्यटक गडावर अडकून पडतात यामुळे आता एक महिना काम होईपर्यंत रस्ता बंद राहणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.