महापोर्टल तातडीने बंद करावं; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून महापोर्टल बंद व्हावं, अशी राज्यातील तरूणांची मागणी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत तसं आश्वासन देखील दिलं होतं. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापोर्टल तातडीने बंद करावं, अशी मागणी केली आहे.

शासकिय नोकरभरती करताना पारदर्शकता रहावी, ऑनलाईन अर्ज करता यावा, यासाठी महापोर्टल सुरू करण्यात आलं होतं. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अनेक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात होत होत्या. राज्यभरात ठिकठिकाणी महापोर्टलविरोधात आंदोलन झालं होतं.
मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापोर्टल विषयी सुप्रिया सुळे यांचं विधानसभेच्या काळातलं भाषण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी महापोर्टलला सक्षम पर्याय देण्यासंबंधी चर्चा केली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.