पंकजा मुंडेंंनी ट्विटर अकाऊंटवरून 'भाजप' शब्द हटवला

0 झुंजार झेप न्युज

भारतीय जनतापक्ष नेत्या पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी काल राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे अशी पोस्ट करत परळी मतदारसंघाला १२ डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरील प्रोफ्राइलमधून 'भाजप' हा शब्द हटवला आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. पंकजा मुडें भाजप पक्षातून बाहेर पडणार का? असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत.
पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाइमध्ये बदल करत केवळ पंकजा मुंडेंच असे नाव ठेवले आहे.


यापूर्वी काल त्यांनी फेसबुक पोस्टवर परळी मतदारसंघाला भावनिक साद घालत आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. तसेच, पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबरला आपल्या समोर येणार असल्याचे म्हटले आहे.
त्याच्या या भुमिकेमुळे राजकीय वर्तुळात भाजप पक्षावर पंकजाताई नाराज आहेत का? पंकजाताई भाजप पक्षातून बाहेर पडणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासोबत पंकजा मुंडे १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर काय भूमिका घेणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.