धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

0 झुंजार झेप न्युज

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळुन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.2) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास उघडकीस आली.
तेजसा श्यामराव पायाळ (वय.26 वर्षे रा. फ्लॅट न.15) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मुळची पंचशील नगर, पालवन रोड, बीड येथील असून तिचे एम बी ए पर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरीच्या शोधासाठी पुण्यात माणिकबाग येथे भाड्याने फ्लॅट घेऊन आई व दोन बहिणी समवेत ती राहत होती.
काही दिवसांपूर्वी हे सर्वजण बीड येथे गेले होते. मात्र तीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती.
सिहंगडरोड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.