7 तासांच्या वेटिंगनंतर अरविंद केजरीवाल यांनी भरला अर्ज शेवटच्या दिवशी उमेदवारी

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी मोठ्या राजकीय नाट्यात आणि सस्पेन्सच्या पार्श्‍वभूमीवर अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्यांना 6 तासांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यासाठी त्यांनी रोड शो काढला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ते निर्धारित वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले.
त्यासाठी ते दुपारी 12 च्या सुमारास निवडणूक कार्यालयात पोहचले. मात्र, तिथे आधीच अपक्ष उमेदवारांची भली मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे क्रमानुसार केजरीवाल यांना 45 क्रमांकाचे टोकन मिळाले. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंतच होती. त्यामुळे केजरीवाल यांच्या अर्ज दाखल करण्याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला.
मात्र, मुदतीच्या आत आलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेणार असल्याचे निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केल्याने आपच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. अर्थात, अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार त्यांचे अर्ज दाखल करण्यासाठी आल्याची बाब राजकारण तापवणारी ठरली. क्रमानुसार आधी आमचे अर्ज स्वीकारा.
तोपर्यंत केजरीवाल यांना अर्ज दाखल करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका अपक्ष उमेदवारांनी घेतली. त्यामुळे प्रतीक्षा करण्यावाचून केजरीवाल यांच्यापुढेही दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आपने भाजपवर टीकास्त्र सोडले.
केजरीवाल यांना अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी भाजपने त्यांच्याआधी सुमारे 40 अपक्ष उमेदवार उभे केले, असा आरोप आपकडून करण्यात आला. अखेर सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अन्‌ नाट्यावर पडदा पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.