मुंबई प्रतिनिधी :
मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणून जप्तीला सुरुवात केली आहे. मुंबईतील फ्लॅट, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील जमीनी, प्रकल्प आणि पतीच्या शेअर्सचा त्यात समावेश आहे.
आयसीआयसीआय बँक व व्हिडीओकॉनच्या ३,२५० कोटींच्या कर्जप्रकरणी सीबीआयने चंदा व दीपक कोचर, व्हिडीओकॉनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण २० बँकांनी या कंपनीला ४० हजार कोटींचे कर्ज मंजूर केले होते.
कर्ज घेतल्यानंतर व्हिडीओकॉनने दीपक यांच्या न्यू पॉवर कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली, असा आरोप आहे.
याच प्रकरणावरून चंदा कोचर यांनी पदाचा राजीनामा दिला. गेल्या वर्षी ईडीनेही मनी लाँड्रिंगचा कोचरविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. त्याचाच भाग म्हणून ईडीने कोचर मालमत्तांवर टाच आणली आहे.

