बदलापूर एमआयडीसी कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्य तर दोनजण जखमी

0 झुंजार झेप न्युज

ठाणे - बदलापूर परिसरात असणाऱ्या एमआयडीसीतील कंपनीत आज सकाळी ९ च्या सुमारास जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले.
एमआयडीसीतील के जे रेमेडिज नावाच्या कंपनीत ही घटना घडली. सकाळच्या सुमारास कंपनीतील ड्रायरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे काही भागात आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आलं असून स्फोटातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.