कामगार संघटनेच्या बंदला राहुल गांधींचे समर्थन !

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात 8 जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये 25 कोटी भारतीय सहभागी होतील असे समितीने स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत समर्थन केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,'मोदी - शाह सरकार लागू करण्यात आलेली जनविरोधी आणि लेबर विरोधातील धोरणांमुळे आज देशात बेरोजगारी वाढत आहे. याचबरोबरीने भारतातील सार्वजनिक क्षेत्राला कमकुवत केले जात आहे. दरम्यान आज २५ करोड कर्मचार्यांनी जेव्हा भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. तर मी आज त्या सर्व लोकांना सलामी देतो.' असं म्हणत त्यांनी भारत बंदला समर्थन दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.