युक्रेनचे प्रवासी विमान तेहरानजवळ दुर्घटनाग्रस्त

0 झुंजार झेप न्युज

युक्रेनचं बोईंग-737 हे प्रवासी विमान इराणमध्ये कोसळल्याचं 
वृत्त आहे. इराणच्या स्थानिक मीडियाने ही बातमी दिली आहे. या विमानात 180 प्रवासी होते.
युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान होतं. इराणची राजधानी तेहरानमधल्या इमाम खोमेनी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळल्याचं वृत्त Fars State या इराणच्या वृत्तसंस्थेने दिलं आहे. हे विमान युक्रेनची राजधानी किव्हला जात होतं.
मात्र, हा अपघात आहे की घातपात हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी ड्रोन हल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना ठार केलं होतं. त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष पेटला आहे.
त्यामुळे विमान कोसळण्याच्या घटनेचा सुलेमानी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे.
घटनास्थळी बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या आणीबाणीविषयक सेवेचे प्रमुख पिर्होसेन यांनी इराणच्या स्थानिक प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे, "विमानाने पेट घेतला आहे. आम्ही आमचं पथक पाठवलं आहे. काही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढू, अशी आम्हाला आशा आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.