. म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय - शरद पवार

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली. यामुळे त्यांना सामाजिक न्यायमंत्रिपद दिलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
कमकुवत मंत्र्याकडे सामाजिक न्यायमंत्रिपद देण्याची प्रथा आजपर्यंत राज्यात चालत होती. मात्र धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं असेल. पण या खात्यामार्फत सर्वसामान्य आणि गरिब जनतेची कामं तात्काळ होणं शक्य आहे. म्हणूनच हे खातं राष्ट्रवादीनं धनंजय मुंडे यांना दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
धनंजय मुंडे यांची ग्रामीण जनतेशी नाळ जोडली आहे. त्यांच्या अडचणी धनंजय मुंडेंना माहिती आहेत. ते चांगल्याप्रकारे त्यांच्या समस्या सोडवू शकतात, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्रालय पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं आहे. या खात्याची जबाबदारी मिळाल्याने धनंजय मुंडे आनंदी असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.