पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे

0 झुंजार झेप न्युज

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेडच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी भोरचे रणजित शिवतारे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नावांची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर विरोधकांनी अर्ज करू नये यासाठी अजेंडावर ठरलेल्या ठिकानी अर्ज प्रक्रिया न करता दुसर्याच ठिकानी अर्ज भरून घेतल्याने विरोधकांनी गोंधळ घातला.
राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने 18 महिला सदस्या इच्छुक होत्या. तर आता काही दिवसांनी इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आरक्षण जाहीर झाल्यापासून अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या महिला सदस्य, त्यांच्या पतीराजांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून पक्ष श्रेष्ठींजवळ आपली बाजू मांडली आहे. त्यामध्ये पानसरे यांना यश आले. तर ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज होते.
दरम्यान विरोधकाच्या गोंधळामुळे निवड प्रक्रिया रखड़ली असून, अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रणजीत शिवतरे यांनी विरोधकांची समजूत काढत होते. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्षाची नावे जाहीर केल्यानंतर बांधकाम समितीचे सभापती पद मिळवण्यासाठी आता सदस्यांमध्ये चाढाओढ लागली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.