शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती

0 झुंजार झेप न्युज

राज्यातील १६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांचे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे यांचीदेखील उचलबांगडी करण्यात आली आहे. तर राव यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या जागी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. सौरभ राव यापुढे राज्याचे साखर आयुक्त म्हणून काम पाहतील. सौरभ राव यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव यांनी सुरुवातीला पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यानंतर महापालिका आयुक्त आणि आता साखर आयुक्त म्हणून ते पुण्यातच कार्यरत राहणार आहेत.
शेखर गायकवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८४ मध्ये कृषी सेवा वर्ग या पदासाठी निवड झाली होती. त्यांनी जिल्हा पुनर्विकास अधिकारी कोल्हापूर, मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव याशिवाय अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणूनही गायकवाड यांनी काम केले आहे. २०१९ मध्येच त्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.