'तान्हाजी' जबरदस्त घौडदौड; १२ दिवसात जमवला इतका गल्ला ?

0 झुंजार झेप न्युज

अजय देवगणचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' रिलीज होऊन 12 दिवस झाले. याच चित्रपटासोबत दीपिका पादुकोणचा 'छपाक'ही रिलीज झाला होता. दोन्ही चित्रपटात दिग्गज स्टार्स असल्याने दोन्ही सिनेमे एकमेकांना जोरदार टक्कर देतील, असा अंदाज होता. पण 'तान्हाजी'समोर दीपिकाच्या 'छपाक'चा फारसा टिकाव लागला नाही. 12 व्या दिवशी या दोन्ही चित्रपटांनी किती गल्ला जमवला, हे जाणून घेऊ या.


'तान्हाजी' हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसतेय. रिलीजच्या 11 व्या दिवशी या चित्रपटाने 8.17 कोटींचा बिझनेस केला आणि काल 12 व्या दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली. यासोबतच 'तान्हाजी'च्या एकूण कमाईचा आकडा 182 कोटींवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत अजयचा हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असे मानले जात आहे. या चित्रपटाचा बजेट 125 कोटी रूपये आहे. हा बजेट कधीच वसूल झाला आहे. सुमारे 3500 स्क्रिन्सवर रिलीज झालेला 'तान्हाजी' ओम राऊतने दिग्दर्शित केला असून अजय देवगण व भूषण कुमार या दोघांची निर्मिती आहे.

दीपिकाच्या 'छपाक'ची कमाई मात्र सुस्त आहे. अद्याप 'छपाक'च्या 12 दिवसांच्या कलेक्शनचा अधिकृत आकडा आलेला नाही. पण जाणकारांच्या मते, 12 दिवशी या चित्रपटाने केवळ 40 लाखांचा बिझनेस केला. आत्तापर्यंतची चित्रपटाची कमाई 35 कोटी रूपये आहे. म्हणजे अद्याप 40 कोटींचा आकडाही या चित्रपटाला पार करता आलेला नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.