Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी

0 झुंजार झेप न्युज

पुणे प्रतिनिधी :
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत पोलीस कुटुंबियाला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
पवार यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यास्थितीत पोलीस वसाहतीचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पोलीस वसाहत परिसरासोबतच पोलीस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केली. पोलीस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्माण करूया, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.