हिंजवडीतील अवैध धंदे बंद करा - प्रतिक्षा घुले

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी  :
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरालगतच्या हिंजवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे पिंपरी युवतीसेनेच्या प्रतिक्षा घुले यांनी केली आहे. हिंजवडी आय.टी.हबमुळे येथे काम करणार्‍यांचे वास्तव्य पिंपरी चिंचवड व आजूबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये बाहेरून आलेले तसेच परप्रांतीय यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तेथे हॉटेल व्यवसाय जोरात चालु आहेत. हॉटेल व्यवसायाबरोबरच तेथे अवैध धंद्यांनीही जोर धरला आहे. हुक्का पार्लर, स्पा सेंटर, पब, मटका, जुगार, पहाटे पर्यंत हॉटेल्स चालु राहणे असले गैरप्रकार सर्रास चालु असतात. याचा येथील स्थानिक रहिवाशांना व सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी पोलिसांनी यावर लवकरात लवकर कडक कारवाई करुन असले अवैध बंद करावे अशी मागणी पोलिस निरीक्षक गवारी यांना करण्यात आली. यावेळी उपशहर प्रमुख डॉ.वैशाली कुलथे, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, शिल्पा अनपन, सुधीर दुरगुडे, सनी कड आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.