Video: सचिन तेंडुलकर ने विनोद कांबळी ला दिले चॅलेंज, म्हणाला एका आठवड्यात 'हे' करून दाखव

0 झुंजार झेप न्युज

मुंबई : कोणते ना कोणते चॅलेंज आपण पाहत असतो. पण सध्याच्या घडीला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपला शाळेतील मित्र विनोद कांबळीला एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज जर त्याने आठवड्याभरात पूर्ण केले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार झाला आहे. आता हे चॅलेंज आहे तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...
हे पाहा काय दिले चॅलेंज...

सचिन आणि गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी एक गाणं तयार केलं होतं.
हे गाणं सोनूबरोबर सचिननेही गायले आहे. या गाण्यामध्ये या दोघांनी रंगत भरली आहे. सचिनने हे पार्श्वगायनामध्ये पदार्पण असेल. कारण यापूर्वी तरी सचिनने कोणताही गाणे गायल्याचे वाटत नाही.
सचिन आणि सोनू यांनी 'क्रिकेटवाली बीट पे' हे गाणं गायलं होतं. या गाण्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता हे गाणं गायचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिले आहे. यासाठी सचिनने त्याला आठवड्याभराची मुदत दिली आहे. या आठवड्याभरात जर कांबळीने हे गाणे व्यवस्थित गायले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार आहे. सचिनचे हे चॅलेंज आता कांबळीने स्वीकारले असून त्याच्याकडे २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.