अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू झाला असतानाच राजधानी दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा तथा सीएए विरोधात मौजपूर परिसरात उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी आंदोलकाने झाडलेली गोळी लागून रतन लाल नावाचा पोलीस ठार झाला तर माथेफिरू आंदोलकांच्या दगडफेकीत दोन पोलिस अधिकार्यांसह 37 पोलिस जखमी झाले. या हिंसाचारात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला.
पोलिसावर दगडफेक करणार्यांना रोखण्याचा प्रयत्नात असतानाच हा गोळीबार झाला. रुग्णालयात दाखल केले असता या पोलीसास डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोकुलपुरीचे सहायक पोलिस आयुक्तांचे ते रीडर म्हणून कार्यरत होते.