तालुक्यातील पिंपळी खुर्दचे सुपुत्र व भारतीय सैन्यात मध्य प्रदेशमध्ये कमांडो म्हणून कार्यरत असलेले विशाल रघुनाथ कडव (वय 35) यांचे रविवारी (दि.23) सायंकाळी अपघाती निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील सागर शहरात दुचाकी व डंपरच्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मंगळवारी सकाळी 10 वा. पिंपळी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
तेरा वर्षांहून अधिक काळ ते भारतीय सैन्यात कार्यरत होते. तब्बल नऊ वर्षे त्यांनी भारत-पाक सरहद्दीवर काश्मीरमध्ये सेवा बजावली. मराठा रेजिमेंट 15 मध्ये ते सेवा बजावत होते.