पिंपरी: १९ फेब्रुवारी ह्या दिवशी जगभरात साजरी होणारे छञपती शिवाजी महाराजांची जयंती छावा कामगार युनियन, बहुजन युवा आंदोलन व मदीना फाउंडेशन यांच्या वतीने देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. छञपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास तुकयाभक्त मधुसुदन पाटील महाराज यांच्या हस्ते पूष्प हार अर्पण करण्यात आला. यावेळी मधुसुदन पाटील महाराज, शशिकांत कांबळे, छावा कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष दिनकर (मामा) खोतकर आणि डाॅ. राजेश शिरोडकर यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले.
या वेळी पिंपरी चिंचवड शहराचे महापौर मा. उषा (माई) ढोरे , छावा कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष दिनकर (मामा) खोतकर, छावा कामगार युनियन पुणे जिल्हा अध्यक्ष पद्माकर काकडे, मदिना फाउंडेशन चे अध्यक्ष निसारभाई सेगुन्शी, रमेश ब्रम्हा ( सामाजिक कार्यकर्ते), बापूराव गायकवाड, बाळा सरोदे, शहनाज कुरणे ( बहूजन युवा आंदोलन - कार्याध्यक्ष) , अरूण तुरुकमारे, राजेंद्र कुचेकर, महादेव गोरख, सुरज रणशिंग अमोल मोरे, उमेश मिसाळ, अमर मोरे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

