हैदराबाद : चिकन आणि अंडी खाल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होते, ही अफवा असल्याचे सिद्ध करण्यासाठी तेलंगणातील मंत्र्यांनी भर कार्यक्रमात स्टेजवरच चिकनवर ताव हाणल्याचे दिसून आले.
Telangana ministers eat chicken on public stage, to dispel rumours about coronavirus
Read @ANI story | aninews.in/news/national/…
125 people are talking about this
हैदराबादमध्ये टँक बंड भागात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री के. टी. रामाराव, इटेला राजेंद्र, तालासनी श्रीनिवास यादव या मंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह फ्राय केलेल्या लेगपीसवर ताव मारला. भर कार्यक्रमात मंत्र्यांनी चिकन खाल्याने या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा झाली.
एका चिकन कंपनीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसची लागण चीनमधील वुहान शहरामधून झालेली आहे.
चीनमध्ये आतापर्यंत या व्हायरसने 2800 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डब्लूएचओने या व्हायरसमुळे जागतिक धोका असल्याचे म्हटले आहे. चिकन व अंडी खाल्याने हा रोगाची लागण होते असे पसरल्यानंतर अनेक देशांमध्ये पोल्ट्री उद्योगावर कुऱ्हाड कोसळली आहे. पण, या अफवेत तथ्य नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केल्यानंतर त्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.


