करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत असं दिसून येतं आहे. ही चिंतेची बाब आहे करोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी हे आवाहन केलं आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता से पालन करें। राज्य सरकारों से मेरा अनुरोध है कि वो नियमों और कानूनों का पालन करवाएं।
23.2K people are talking about this


