अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.
हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
CBI sources: A weapon (Pistol) recovered from the creek near Thane. A team was searching for the murder weapon used in the murder of activist Narendra Dabholkar. It is still to be ascertained if it is the same weapon. The weapon will be sent for ballistic examination.
20 people are talking about this
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं हे स्पष्ट होईल.


