किरिन पोलार्ड ठरला ५०० टी २० खेळणारा पहिला खेळाडू

0 झुंजार झेप न्युज

वेस्ट इंडीज ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात नावावर केला. वेस्ट इंडिजनं या सामन्यात श्रीलंकेवर २५ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजच्या ४ बाद १९६ धावांचा पाठलाग करतान श्रीलंकेचा संपूर्ण संघ १७१ धावांवर तंबूत परतला.
या सामन्यात पोलार्डनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला पार केला. पण, मैदानावर पाऊल टाकताच त्यानं नावावर केलेला विक्रम आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या विंडीजनं ४ बाद १९६ धावा केल्या. सलामीवीर लेंडल सिमन्स आणि ब्रँडन किंग यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करून दिली. किंग २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरणला ( १४) मोठी खेळी करता आली नाही. आंद्रे रसेल आणि पोलार्ड यांनी तुफानी फटकेबाजी केली. रसेलनं १४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ३५, तर पोलार्डने १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३४ धावा केल्या. लेंडल सिमन्स ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार खेचून ६७ धावांवर नाबाद राहिला. पोलार्डने या खेळीसह ट्वेंटी-२०त दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला.


लक्ष्याचा पाठलाग करताना कुसल परेरा आणि वनिंदू डी सिल्व्हा यांनी संघर्ष केला. परेरानं ३८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ६६ धावा चोपल्या, तर विनंदूनं ३४ चेंडूंत ४४ धावा केल्या. पण, अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानं श्रीलंकेचा संघ १७१ धावांत माघारी परतला. विंडीजच्या ओशाने थॉमसने २८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. या सामन्यात पोलार्डने ५०० ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा विक्रम नावावर केला. हा विक्रम करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला.

सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने खेळणारे खेळाडू
किरॉन पोलार्ड - ५००
ड्वेन ब्राव्हो - ४५३
ख्रिस गेल - ४०४
शोएब मलिक - ३८२
ब्रेन्डन मॅकलम - ३७०
ट्वेंटी-२०त १० हजार धावा करणारा दुसरा फलंदाज
ख्रिस गेल - १३२९६ धावा
किरॉन पोलार्ड - १०००० धावा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.