मुंबई: कोरोनाचं थैमान आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं येस बँकेवर घातलेले निर्बंध याचा मोठा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात, अशी भीती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली. त्यानंतर अमेरिकेन शेअर बाजाराचा निर्देशांकात घसरण झाली.
त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळाला. सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला, तर निफ्टी ४०० अंकांनी खाली आला.

